2018मध्ये चर्चेत होता 'या' सेलिब्रिटींचा लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 06:58 PM2019-01-01T18:58:27+5:302019-01-01T19:03:21+5:30

2018 हे वर्ष बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या लग्नासोबतच फॅशन आणि स्टाइल्समुळे चर्चेत राहिले. शिल्पा शेट्टीचा साडी गाऊन चर्चेत होता, तर सोनम कपूरचा शॉर्ट्स आणि ब्लेझर लूकने चाहत्यांना घायाळ केलं. फक्त देशातील सेलिब्रिटीच नाही तर परदेशी सेलिब्रिटींच्या लूकवरही चर्चा होताना दिसल्या. अमेरिकेती प्रसिद्ध गायिका बियॉन्सेने आपल्या देसी अवताराने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. आज जाणून घेऊया मागील वर्षात धुमाकूळ घातलेल्या काही सेलिब्रिटींच्या लूक्सबाबत...

हॉलिवूडची अशी स्टार जी संपूर्ण देशी अवतारामध्ये दिसून आली ती म्हणजे, प्रसिद्ध अमेरिकेन सिंगर बियॉन्से. उद्योगपती मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीच्या लग्नाच्या फंक्शनदरम्यान परफॉर्म करण्यासाठी आलेली बियॉन्सेने लाल रंगाचं सुंदर कफ्तान ड्रेस वेअर केला होता. प्रसिद्ध डिझायनर जोडी अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केला होता. बियॉन्सच्या ड्रेससोबत चर्चेत होते तिने परिधान केलेले मोठे इयरिंग्ज.

सर्वात आधी हॉलिवूड सेन्सशन आणि सोशल मीडिया स्टार किम कार्डैशियनबाबत जाणून घेऊया. किमने 2018मध्ये साडी परिधान करून एका मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. किमच्या या रेड कलरची शिमरी साडी डिझाइन केली होती भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने. किमचा हा सेक्सी साडी लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

रणवीर सिंह बॉलिवूडचा एकमेव असा सेलिब्रिटी आहे जो आपल्या अभिनयासोबतच आपल्या विचित्र फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. वर्ष 2018मध्ये रंगलेल्या 63व्या जियो फिल्मफेयर अवॉर्ड्स दरम्यान रणवीर सिंहने एक असाच विचित्र सूट वेअर केला होता. ज्यावर 90च्या दशकातील त्याच्या आवडत्या चित्रपटांचे पोस्टर्स छापण्यात आले होते.

2018मध्ये साडीसारख्या ट्रेडिशनल अटायरला जर कोणी वेगळी ओळख दिली असेल तर ती म्हणजे शिल्पा शेट्टीने. हटके अंदाजात तिने साडी परिधान केली होती. शिल्पाचा हा साडी गाऊन लूक सर्वात जास्त चर्चेत राहिला. शिल्पाची ही साडी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रोने डिझाइन केला होता.

2018मध्ये एका फॅशन शो दरम्यान फिल्म मेकर करण जौहर शो स्टॉपर बनून रॅम्प वॉक केला होता. यादरम्यान करणच्या लूकने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. करणचं हे ब्लॅक, ग्रे आणि सिल्वर कलरचा शिमर सूट जेवढा चर्चेत राहिला त्यापेक्षा जास्त चर्चा त्याच्या सॉल्ट अॅन्ड पेपर हेअरस्टाइलची चर्चा होताना दिसली.

2018चं संपूर्ण वर्ष फक्त आणि फक्त दीपिकाचीच चर्चा होती असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 2018च्या सुरूवातीला पद्मावतच्या रिलिजदरम्यान आणि त्यानंतर रणवीर सिंगसोबत बांधलेल्या लग्नगाठीमुळे दीपिका चर्चेत होती. परंतु, 2018मध्ये एका इव्हेंट दरम्यान दीपिका दिसून आली रेड आणि व्हाइट कलरच्या स्ट्राइप असणाऱ्या जॉर्जेट साडीमध्ये. तिच्या त्या लूकला चाहत्यांनी कॅन्डी लूक म्हणून डोक्यावर घेतले.

कान्स 2018मध्ये बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने आपला डेब्यू केला आणि त्यादरम्यान तिच्या लूकने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. कान्स फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी कंगनाच्या आउटफिटची सर्वत्र चर्चा होती. कंगना ने nedo ने डिझाइन केलेला एम्ब्रॉयडरी असलेला बॉडीकॉन जंपसूट वेअर केला होता.