साऊथच्या 'या' स्टारकडे आहेत '३६९' कारचं कलेक्शन, कार्ससाठी तयार केलं वेगळं गॅरेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 05:07 PM2019-02-12T17:07:28+5:302019-02-12T17:20:09+5:30

सिनेमातील कलाकार जसजसे यशाची पायरी वर चढत जातात, तसतशी त्यांची लाइफस्टाइलही आणखी बदलत जाते. बॉलिवूड कलाकारांना कार किंवा बाईकबाबत असलेली क्रेझ तुम्हाला माहीत असेलच. पण आज आम्ही अशा एका कलाकाराबाबत सांगणार आहोत, ज्याची कारची क्रेझ देशातील सर्वच कलाकारांना मागे टाकते. हा स्टार आणि साऊथमधील सुपरस्टार मामुट्टी.

मामुट्टी हा मल्याळम आणि तमिळ सिनेमाचा सुपरस्टार आहे. अनेक सुपरहिट सिनेमे त्याने दिले आहेत. रजनीकांत इतकीच मामुट्टीचीही लोकप्रियता आहे. मामुट्टीला कार्सची फारच आवड आहे. त्याच्याकडे १५-२० नाही तर अनेक कार्स आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व कार ठेवण्यासाठी त्याने एक वेगळं गॅरेजच तयार केलं आहे. त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या प्रत्येक कारचा नंबर हा ३६९ हा असतो. त्याच्या या कार कलेक्शनमध्ये स्वस्तातली स्वस्त आणि महागातली महाग कार आहे.

इतकेच नाही तर त्याने काही वर्षांपूर्वी देशातील पहिली मारूती - ८०० कार खरेदी करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मामुट्टीला स्वत: कार ड्राइव्ह करायला आनंद वाटतो. चला जाणून घेऊ त्याच्या कार कलेक्शनमध्ये कोणकोणत्या कार्स आहेत.

मेगास्टार मामुट्टीच्या कार कलेक्शनमध्ये जग्वॉर XJ-L (कॅवियर) सर्वात लेटेस्ट कार आहे. या कारचे दोन्ही व्हर्जन त्याच्याकडे आहेत. या कारचं रजिस्ट्रेशन नंबरही (KL 7BT 369) 369 कलेक्शन सारखाच आहे.

त्यासोबतच मामुट्टीच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा लॅंड क्रूजझर LC 200, फरारी, मर्सिडीज आणि ऑडी चे वेगवेगळे मॉडल्स, पोर्श, टोयोटा फॉर्च्यूनर, Mini Cooper S, F10 BMW 530d आणि 525d, E46 BMW M3, Mitsubishi Pajero Sport, फोक्सवॅगन पॅसेट X2 आणि अनेक SUV's कार आहेत. तसेच मामुट्टीकडे आयशरची एक कॅरा व्हॅनही आहे. ही व्हॅन त्याने मॉडिफाइड करून घेतली आहे.

मामुट्टीला साऊथमध्ये ऑडी विकत घेणारा पहिला स्टारही म्हटलं जातं. मामुट्टीला देशातील मारूती कारसोबत जास्त जिव्हाळा आहे. त्याने पहिली खरेदी केलेली कारही मारूती होती. त्याच्या कारचा नंबरही ३६९ होता आणि आजही कार त्याच्याकडे आहे.