'या' आहेत बॉलिवूडमधील गूढ आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 05:23 PM2018-03-29T17:23:35+5:302018-03-29T17:23:35+5:30

बॉलिवू़डची चंदेरी दुनिया बऱ्याच कलाकारांसाठी त्यांचं आयुष्य बदलणारी ठरली आहे. बॉलीवूडचं जग बाहेरून कितीही लखलखतं असलं तरी या क्षेत्रात बराच अंधार आहे. सिनेसृष्टीशी संबंधित कलाकार तणावामुळे निराश होऊन आयुष्य संपवण्यासारखं चुकीचं पाऊल उचलतात. बॉलिवू़डमधील अशाच काही कलाकारांनी नैराश्यामुळे स्वत:चं आयुष्य संपवलं.

१) जिया खान - 'निशब्द' व 'गजीनी' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने खूप कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली होती. जुहू येथील राहत्या घरी तिने गळफास लावून आत्महत्या केली. वैयक्तिक आयुष्यातील तणाव आणि नैराश्य तिच्या मत्यूचं कारण होतं. जियाच्या मृत्यूवरून विविध तर्क वितर्कही करण्यात आले होते.

२) दिव्या भारती - ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री दिव्या भारतीची आत्महत्या अजूनही रहस्यचं आहे. वयाच्या १९ व्या वर्षी दिव्याचा मृत्यू झाला. पण तिचा मृत्यू खिडकीतून पाय घसरून झाला कि तिनं स्वत:हून खिडकीतून उडी मारली याचा उलगडा अजूनही झाला नसून तिचा मृत्यू आत्महत्या होता कि अपघात हे अस्पष्टच आहे.

३) गुरूदत्त - अभिनेते गुरूदत्त यांना त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत पाहण्यात आलं. मेडिकल रिपोर्टनुसार रक्तात झोपेच्या गोळ्याचं व मद्याचं प्रमाण जास्त आढळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा सांगण्यात आलं. तसंच वैवाहिक आयुष्याला कंटाळून गुरूदत्त यांनी आत्महत्या केली असण्याचा दावा करण्यात येत होता.

४) सिल्क स्मिता - दक्षिण भारतीय सिनेमा गाजवलेली अभिनेत्री म्हणून सिल्क स्मिताचा उल्लेख होतो. आपल्या राहत्या घरी सिल्क स्मिताने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात चित्रपटातून येत असलेल्या अपयशातून आत्मह्त्या करत असल्याचं तिने लिहिलं होतं.

५) परवीन बाबी - २००५ साली परवीन यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला. काही दिवस दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर परवीन घरात मृतावस्थेत आढळल्या. परवीन यांना डायबिटिसचा त्रास होता. त्याचप्रमाणे आयुष्यातील एकटेपणा कायमचा संपवण्यासाठी परवीन यांनी आत्महत्या केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला होता.