'छपाक'मधील दीपिकात दिसतेय तेजाब पीडित लक्ष्मीची छाप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 08:39 PM2019-03-25T20:39:49+5:302019-03-25T21:06:10+5:30

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच 'छपाक' चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.

लक्ष्मी अगरवाल ही दिल्लीतल खान मार्केटमधील पुस्तकाच्या दुकानात काम करणारी मुलगी होती. सन 2015 मध्ये 15 वर्षांची असताना लक्ष्मी अॅसिडची शिकार बनली.

लक्ष्मीने तिच्यापेक्षा वयाने दुप्पट मोठा असलेल्या व्यक्तीच्या प्रेमाला नकार दिला होता. त्यामुळे तिच्यावर हा अॅसिड हल्ला करण्यात आला. आपलचा चेहरा आरशात पाहिताना तिला असह्य वेदना होत. तर, अनेकदा आत्महत्या करावी, असाही विचार तिच्या मनात येई. लक्ष्मीचे लग्न झाले असून तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे.

लक्ष्मीने तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाला मोठ्या हिम्मतीने तोंड दिले. तसेच, तेजाब पीडित मुलींसाठी ती एक प्रेरणा बनली आहे. आज लक्ष्मी एक सेलिब्रिटी बनली असून तिने इंदौर येथील फॅशन शोमध्येही भाग घेतला होता.

या चित्रपटातील दीपिकाच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या लूकची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होते आहे. त्यात अभिनेत्री कंगना रानौतची बहिण रंगोल चंडेलने छपाकच्या पोस्टरवर प्रतिक्रिया दिली आहे.