ईश्क वाला लव्ह; युवीची पत्नी हेजलसह जिवाची मुंबई

इंडियन प्रीमिअर लीगला 23 मार्चपासून सुरुवात होणार आहे आणि मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला होणार आहे

भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंग यंदा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे आणि यंदाच्या हंगामात धमाका करण्यासाठी तो सज्ज आहे

या सामन्यापूर्वी युवीनं मंगळवारी मुंबईत पत्नी हेजल कीचसह फेरफटका मारला... त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

युवी आणि हेझल यांनी वांद्रेतील एका हॉटेलमध्ये भोजन केले.

मुंबई इंडियन्सने 1 कोटीच्या मुळ किंमतीत युवीला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले.

युवराज आणि हेजल यांचे 30 नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न झाले