लाहोरमध्ये रंगणार वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध पाकिस्तान टी-20 सामने

तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्तानच्या मैदानावर आतंरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळविले जाणार आहेत.

वर्ल्ड इलेव्हन आणि पाकिस्तान यांच्यात 12, 13 आणि 15 सप्टेंबरला तीन टी-20 सामने होणार आहेत.

या सामन्यांसाठी पाकिस्तानमधील लाहोरच्या मैदानात दोन्ही संघाचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत.

वर्ल्ड इलेव्हन संघाचे नेतृत्व फाफ ड्युप्लिसी करणार आहे, तर पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व सरफराज अहमद करणार आहे.

2009 साली श्रीलंलेच्या संघावर लाहोर मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यावर आयसीसीने बंदी घातली होती.

विशेष म्हणजे, या सामन्यात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.