तेंडुलकरचा 'हा' विक्रम कोहली मोडणार का?

भारताचा कर्णधार विराट कोहलीने मैदानावर उतरतो तो नवीन विक्रम करण्यासाठीच... वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतही त्याची प्रचिती आली. त्याने एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करण्याचा पराक्रम करताना अनेक दिग्गजांशी बरोबरी केली, परंतु सर्वाधिक वेळा एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे आणि कोहलीला पुढील वर्षात सातत्यपूर्ण खेळ करून तो मोडण्याची संधी आहे. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा 1000 धावा करणारे अव्वल पाच खेळाडू कोण, ते पाहूया...

कुमार संगकारा, श्रीलंका ( 2004, 2006, 2011, 2012, 2013, 2014)

रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया ( 1998, 1999, 2003, 2005, 2007, 2009)

सौरव गांगुली, भारत ( 1997, 1998, 1999, 2000, 2002, 2007)

विराट कोहली, भारत (2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018)

सचिन तेंडुलकर, भारत (1994, 1996, 1997, 1998, 2000, 2003, 2007)