वर्ल्ड कप ट्रॉफी कोण उंचावणार?... जाणून घ्या सगळ्यात तगडा संघ कोणता!

मुंबई, आयसीसी, वर्ल्ड कप 2019 : आयसीसी वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा महिन्याभरावर आली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ जेतेपदाच्या दावेदारांत आघाडीवर आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेकरीता प्रत्येक संघाने आपल्याकडील सर्वोत्तम खेळाडूंना अंतिम 15 जणांच्या चमूत दाखल केले आहे. त्यामुळे ही स्पर्धा वाटते तितकी सोपी नक्कीच असणार नाही. यजमान इंग्लंडची गेल्या दोन वर्षांतील कामगिरी त्यांना दावेदारांच्या पंक्तीत बसवते... ऑस्ट्रेलियाची कामगिरी साजेशी झालेली नसली तरी स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनाने खेळाडूंना जणू नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे.

पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या संघांनी नेहमीच डार्क हॉर्सची भूमिका निभावली आहे. या संघांकडून अनपेक्षित निकाल पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. या सर्वात वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे धोक्याची घंटाच समजा.. विंडीज खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता ते कोणत्याही संघाच्या गोलंदाजीची चिंधड्या उडवू शकतात. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याकडून फार चांगल्या कामगिरीची अपेक्षा नसली तरी ते एकाद्या सामन्यात तगड्या प्रतिस्पर्धींना धक्का नक्की देतील.

ऑस्ट्रेलियाः अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, अ‍ॅलेक्स केरी, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, झाय रिचर्डसन, नॅथन कुल्टर-नाईल, जेसन बेहरेनडॉर्फ, नॅथन लियोन, आणि अ‍ॅडम झम्पा.

बांगलादेशः मश्रफे मोर्ताझा ( कर्णधार), शकिब अल हसन ( उपकर्णधार), तमीत इक्बाल, महमदुल्लाह, मुश्फीकर रहीम, सौम्या सरकार, लिटन दास, सब्बीर रहमान, मेहिदी हसन, मोहम्मद मिथून, रुबेल होसैन, मुस्ताफिजूर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन, मोसाडेक होसैन, अबु जायेद.

न्यूझीलंडः केन विलियम्सन ( कर्णधार), मार्टिन गुप्तील, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलीन मुन्रो, टॉम ब्लंडल, जिमी नीशॅम, कॉलीन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, इश सोधी, टीम साऊदी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

श्रीलंकाः दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविष्का फर्नांडो, लाहिरू थिरिमाने, कुशल परेरा (विकेटकीपर), कुशल मेंडिस (विकेटकीपर), अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डि'सिल्वा, जेफ्री वैंडेसरे, थिसारा परेरा, इसुरु उडाना, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा श्रीवर्दना.

भारतः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

पाकिस्तानः सर्फराझ अहमद (कप्तान), इमाम उल हक, बाबर आझम, फखर जमान, आबिद अली, जुनैद खान, मोहम्मद हफीज, फहीम अशरफ, मोहम्मद हुसैन, शादाब खान, हारिस सोहेल, शाहीन अफरीदी, हसन अली, शोएब मलिक, इमाद वसीम.

दक्षिण आफ्रिकाः फॅफ डू प्लेसिस (कर्णधार), जे.पी. ड्युमिनी, डेव्हिड मीलर, डेल स्टेन, एंडिल फेहलुकवायो, इम्रान ताहीर, कागिसो रबाडा, ड्वेन प्रेटोरियस, क्विंटन डीकाँक (यष्टीरक्षक) एन्रिक नोर्त्जे, लुंगी एन्डिंगी, एडेन मार्कराम, रॉसी वॅन डर डुस्सेन, हाशिम अमला आणि तबरेज शम्सी.

इंग्लंडः इयॉन मॉर्गन ( कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, ख्रिस वोक्स, लिएम प्लंकेट, आदील रशीद, मार्क वूड, अ‍ॅलेक्स हेल्स. टॉम कुरन, जो डेन्ली, डेव्हिड विली

वेस्ट इंडिजः जेसन होल्डर (कप्तान), आंद्रे रसेल, एश्ले नर्स, कार्लोस ब्रॅथवेट, क्रिस गेल, डॅरेन ब्राव्हो, एविन लुइस, फॅबियन एलेन, केमार रोच, निकोलस पूरन, ओशाने थॉमस, शाई होप, शॅनन गॅब्रियल, शेल्डन कोटरेल, शिमरॉन हेटमायर.

अफगाणिस्तानः गुलबदीन नईब (कर्णधार), मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), नूर अली झरदान, हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, असगर अफगाण, हशमतुल्लाह शाहिदी, नजीबुल्लाह झरदान, समीउल्लाह शेनवारी, मोहम्मद नबी, रशिद खान, दौलत झरदान, आफताब आलम, हामिद हसन आणि मुजीब उर रहमान.