गंभीरपूर्वी कोणत्या क्रिकेटपटूंनी केली राजकारणाच्या पीचवर बॅटींग, जाणून घ्या...

भाजपामध्ये गौतम गंभीरने आज प्रवेश केला. गंभीरला दिल्लीतून लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

भारताचे माजी सलामीवीर सिद्धू 2004 ते 2014 या कालावधीमध्ये लोकसभा निवडणूकींमध्ये जिंकून आले होते. सध्या सिद्धू यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद हे भारताने 1983 साली जिंकलेल्या विश्वचषकाच्या संघातील सदस्य होते. आझाद हे 1993 सालापासून भाजपामध्ये आहेत.

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनने 2009 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणूकही जिंकला. पण 2014 साली अझरला पराभव पत्करावा लागला.

भारताचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनी दोनदा निवडणूक लढवली, पण त्यांना एकदाही जिंकता आले नाही.

भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान हे भाजपाबरोबर कार्यरत आहेत.

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू मनोज प्रभाकर यांनी काँग्रेसकडून 1998 साली निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभव पत्करावा लागला.

भारताचा माजी कर्णधाक मोहम्मद कैफने निवडणूक लढवली खरी, पण त्यामध्ये तो अपयशी ठरला.