वेल डन कोहली

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 189 भागीदारीच्या जोरावर भारताने दर्बान येथे झालेल्या पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली.

विराट कोहलीने 112 तर अजिंक्य रहाणेने 79 धावा फटकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शानदार शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीने सामनावीराचा मान पटकावला.

विराट कोहलीने काल वनडेमधील 33 वे शतक झळकावले.

द. आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी 270 धावांचे आव्हान ठेवले.