मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आलिशान बंगल्याचे फोटो

क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरच्या प्रत्येक रेकॉर्डबाबत तुम्हाला माहिती असेल. पण तो ज्या घरात राहतो ते आतून कसं आहे हे तुम्हाला नक्कीच माहिती नसणार. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या सचिनच्या घराचे फोटो घेऊन आलो आहोत.

सचिन तेंडुलकर काही वर्षापूर्वीच बांद्र्यातील या घरात शिफ्ट झाला. याआधी सचिन बांद्र्यातीलच दुस-या घरात राहत होता.

सचिनने एका पारसी कुटुंबाकडून दोराब व्हिला हा 1920 मध्ये बांधलेला बंगला विकत घेतला होता. हा बंगला त्याने 35 कोटी रुपयांना विकत घेतला होता. हा बंगला पुन्हा बांधायला 4 वर्ष लागली. त्यानंतर सचिन इथे 2011 मध्ये शिफ्ट झाला. हा बंगला 10 हजार स्क्वेअर फूट परिसरात पसरला आहे.

या बंगल्याची खासियत म्हणजे यात सचिनने शेल हाऊस तयार करुन घेतले आहेत. या शेल हाऊसचं डिझाईन फारच आकर्षक करण्यात आलं आहे.

हा बंगला लक्झरी असण्यासोबतच यूनिकही बनवण्यात आलाय. सचिनच्या या बंगल्यात तब्बल 30 ते 40 कार एकाचवेळी पार्क केल्या जातील इतकं मोठं पार्किंग आहे.

या बंगल्यात दोन अंडरग्राऊंड बेसमेंटही तयार करण्यात आले आहेत. हे खास सचिनच्या आवडी-निवडी लक्षात ठेवून तयार करण्यात आले आहे.

सचिन आणि त्याच्या पत्नीची बेडरुम घराच्या टॉप फ्लोरवर आहे. हे घर अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही या घरात अनेक उपाय करण्यात आले आहेत.

या बंगल्यात सचिनने एक गणेशाचं मंदिरही तयार करुन घेतलं आहे.

सचिन आणि त्याच्या पत्नीची बेडरुम घराच्या टॉप फ्लोरवर आहे. हे घर अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज आहे.

सचिनच्या मुलांचे रुम्स आणि गेस्ट रुम खालच्या मजल्यावर आहेत.