विराटच्या साथीला अनुष्का! टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना

विराट कोहलीची टीम इंडिया मुंबईहून दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली. मुंबईवरुन पहाटे 4 च्या विमानाने भारतीय संघ दुबईला रवाना झाला. तिथून ते दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील.

महिनाभर लग्नाच्या धामधुमीत व्यस्त असलेला विराट कोहली आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे.

विराट कोहलीसोबत यावेळी अनुष्का शर्माही होती. अनुष्काही आफ्रिका दौऱ्यावर गेली आहे.

या दौऱ्यात भारतीय संघ 3 कसोटी, 6 वन डे आणि 3 टी 20 सामने खेळणार आहे. येत्या 5 जानेवारीपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला सुरुवात होईल.