सचिन-धोनीपासून इशान किशनपर्यंत क्रिकेटरकडे आहेत या महागड्या गाड्या

युवा क्रिकेटर इशान किशनने आयपीएल संपल्यानंतर बीएमडब्लू एक्स खरेदी केली आहे.

भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी बाईकप्रमाणे कारचाही चाहता आहे. त्याच्याकडे फरारी 599 जीटीओ ही गाडी धोनीची आवडती आहे. याशिवाय हमर, टोयटा कोरोला, कस्टमाइज्ड स्कोर्पिओ, पजेरो यासारख्या गाड्या आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं क्रिकेट प्रेम जगविख्यात आहे. पण सचिन वेगवेगळ्या कारचाही चाहता आहे हे खूप कमी लोकांना माहितंय. सचिनकडे त्याच्या पहिल्या मारूती ८०० पासून ते सध्याच्या बीएमडब्लू आणि ऑडीपर्यंत सर्व कार आहेत. सचिनचं गॅरेज पाहिलं की त्याच्या कारप्रेमाचा प्रत्यय येतो. १) बीएमडब्लू 750 एम स्पोर्ट

क्रिकेटर सुरेश रैनाकडे फोर्श बोक्सटर एस आहे. यामध्ये 3.4 लीटर फ्लेट 6 इंजिन आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे बीएमडब्लू एक्स -6 आणि ऑडी आर -8 यासारख्या महागड्या गाड्या आहेत.

विरेंद्र सेहवागकडे दोन कोटींपेक्षा आधिक किंमतीची कोंटिनेंटल फ्लाईंग स्पूर ही महागडी गाडी आहे.

युवराज सिंगकडे लँबोर्निनी आणि पोर्श गाड्या आहेत. बीसीसीयाचे उपाध्यक्ष ललित मोदी यांनी युवराजला पोर्श गाडी गिफ्ट केली होती.