कोहलीने एका सामन्यात केले बरेच विक्रम, पाहा...

विराट कोहलीने 224 एकदिवसीय सामने आणि 216 डावात 40 शतके पूर्ण करण्याची किमया साधली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके फटकावणाऱ्या फलंदाजांच्या क्रमवारीत विराट दुसऱ्या स्थानी आहे.

कोहलीपुढे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 49 शतकांसह सर्वाधिक एकदिवसीय शतके फटकावणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानी आहे.

विराटचे एकदिवसीय क्रिकेटमधील 40 वे शतक

विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही सातवी शतकी खेळी ठरली.

कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जलद नऊ हजार धावा करणारा कोहली हा पहिला खेळाडू

कोहलीने सामन्यानंतर विजय शंकरवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.