उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघाच्या हस्ते विराटचा सत्कार

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघातर्फे उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यात आलं आहे.

डीडीसीएने महिला संघाच्या माजी कर्णधार सुनिता शर्मा, राखी मेहरा, रेणुका दुआ, जया शर्मा, ललिता शर्मा, रजनी शर्मा आणि अंजुम चोप्रालाही सन्मानित केलं आहे.

50 शतकांच्या कामगिरीबद्दल बिशनसिंग बेदी यांच्या हस्ते विराटचा सत्कार करण्यात आला.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पहिल्या वार्षिक संमेलनामध्ये कसोटी क्रिकेटबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात विराटने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव सांगितले.

बेदी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे सन्मानाची बाब असल्याचे विराटने म्हटले.