अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारताचा पापुआ न्यू गिनियासंघावर 10 विकेट राखून विजय

अंडर -19 वर्ल्डकपच्या दुस-या सामन्यात भारताने पापुआ न्यू गिनिया संघाचा धुव्वा उडवत 10 विकेटने दणदणीत विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा पृथ्वी शॉ चा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारताच्या भेदक मा-यासमोर पापुआ न्यू गिनियाचा संघ अवघ्या 64 धावात गारद झाला.

कॅप्टन पृथ्वी शॉ ने 36 चेंडूत नाबाद 57 धावा तडकावल्या यात 12 चौकारांचा समावेश होता.

पापुआ न्यू गिनियाचा कर्णधार व्ही.काराहोबरोबर हस्तांदोलन करताना पृथ्वी शॉ.

वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताने बलाढय ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.