वनडेतील अव्वल सात शतकवीर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 463 एकदिवसीय सामन्यात 452 डावामध्ये फलंदाजी करताना 49 शतके झळकावली आहेत. सचिनची सर्वोच्च धावसंख्या 200 आहे, तर त्यानं 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत.

भारताचा कप्तान विराट कोहलीने 194 एकदिवसीय सामन्यात 186 डावामध्ये 55.76 च्या सरासरीने 8587 धावा फटकावल्या आहेत. त्याने एकूण 30 शतके झळकावली असून विराटची सर्वोच्च धावसंख्या 183 आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 375 एकदिवसीय सामन्यात 365 डावामध्ये 42 च्या सरासरीने 30 शतकासह 13704 धावा फटकावल्या आहेत.

श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याने 445 एकदिवसीय सामन्यातील 433 डावामध्ये 28 शतकांच्या मदतीने 13430 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 189 आहे.

हाशिम आमलाने 156 वनडेत 25 शतके झळकावताना 7186 धावा केल्या आहेत. त्याची 50.25 ची सरासरी आहे. दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे.

श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 404 एकदिवसीय सामन्यातील 380 डावामध्ये फलंदाजी करताना 25 शतके झळकावली आहेत. त्याने 41.98 च्या सरासरीने 14234 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलर्सने 222 एकदिवसीय सामन्यात 24 शतकासह 9319 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 53.55एवढी आहे.