'हे' आहेत भारताचे सर्वात दुर्देवी क्रिकेटपटू, तुम्हाला माहिती आहेत का...

भारतीय संघातील चॉकलेच बॉय आणि दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे सुरेश रैना. भारताकडून खेळताना त्याने बऱ्याचदाल नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पण तरीही रैना भारतीय संघातील स्थान टिकवू शकलेला नाही.

आतापर्यंत यष्टीरक्षक आणि फलंदाजी या दोन्ही जबाबदाऱ्या दिनेश कार्तिकने चोख बजावल्या आहेत. पण कार्तिकला संघातील स्थान आतापर्यंत कधीच कायम ठेवता आलेले नाही.

फलंदाज आणि गरज पडल्यास यष्टीरक्षण करणारा खेळाडू म्हणजे रॉबिन उथ्पपा. उथप्पाने परिस्थितीनुसार आपल्या खेळामध्ये नेहमीच बदल केली. पण 2014 सालानंतर उथप्पाला संघात स्थान मिळवता आलेले नाही.

सध्याच्या क्रिकेट जगतातील सर्वोत्तम लेग स्पिनर्सपैकी एक, असे अमित मिश्राचे नाव घेतले जाऊ शकते. आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या मिश्राला संघात मात्र कायम ठेवले गेले नाही.

गेल्या 25 वर्षांतील सर्वोत्तम तंत्रशुद्ध सलामीवीर, अशी वसिम जाफरची ओळख आहे. जाफरने सलामीला येऊन चांगली कामगिरी बजावली असली तरी संघातील स्थान कायम ठेवण्यात जाफर दुर्देवी ठरला.