विश्वचषकातील सामन्यांवर यापूर्वी काही संघांनी टाकला होता बहिष्कार

ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1996 साली झालेल्या विश्वचषकात सुरक्षेच्या कारणास्तव श्रीलंकेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

वेस्ट इंडिजच्या संघानेही या विश्वचषकात श्रीलंकेमध्ये खेळण्यास असमर्थता दर्शवली होती.

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया या देशांमध्ये संयुक्तरीत्या 2003 साली विश्वचषक झाला होता. इंग्लंडच्या संघाने यावेळी झिम्बाब्वेमध्ये खेळण्यास नकार दिला होता.

या विश्वचषकात न्यूझीलंडने केनियातील नैरोबी येथील सामन्यात आम्ही खेळणार नाही, हे स्पष्ट केले होते.