वनडे मालिकेत भारताची विजयी सलामी!

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दणक्यात सुरुवात केली आहे.

कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 189 भागीदारीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली

विराट कोहलीने 112 तर अजिंक्य रहाणेने 79 धावा फटकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला

विजयाबरोबरच भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शानदार शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीने सामनावीराचा मान पटकावला.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली.