टीम इंडियाकडून लंका'दहन'

भारताने तिस-या कसोटीत श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला

भारताने श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाइटवॉश दिला

भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे

28 वर्षांच्या विराट कोहलीने आपल्या अवघ्या 29 व्या कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळताना हा पराक्रम केला

विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेतील हा भारताचा 18 वा मालिका विजय ठरला

विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे

भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या सलग 9 मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.

आतापर्यंत 33 जणांनी भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भुषवलं आहे, पण केवळ कोहलीलाच परदेशात व्हाइटवॉश देण्याचा पराक्रम करता आला.