...म्हणून धोनीच्या आयुष्यात विशाखापट्टणमचे विशेष स्थान

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने विशाखापट्टणम स्टेडियमवर पोहचल्यावर खेळपट्टीचा पोत बघितला. त्याने या मैदानाशी जोडलेल्या आठवणींनाही उजाळा दिला.

भारताला दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीने दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी खेळपट्टीची पाहणी केली आणि त्याने क्युरेटरशी चर्चाही केली. त्याने या खेळपट्टीची माहिती करून घेतली.

याच मैदानावर 13 वर्षांपूर्वी धोनीने पाकिस्तानविरुद्ध 148 धावांची वादळी खेळी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला.

37 वर्षांच्या धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून सुरुवात केली. मात्र, 2005 च्या पाकिस्तानविरुद्धच्या खेळीने त्याला ओळख मिळवून दिली.

त्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर येताना त्याने 123 चेंडूंत 148 धावांची खेळी केली. भारतीय संघाने हा सामना जिंकला आणि धोनीने मागे वळून पाहिले नाही.