ती मॅच पाहायला आली, हसली आणि तिने जिंकलं...

RCBच्या विजयापेक्षा प्रेक्षकांमध्ये असलेल्या 'त्या' तरुणीचीच चर्चा अधिक रंगली. सोशल मीडियावरही त्या तरुणीचीच हवा होती.

बंगळुरूचा सामना पाहायला आलेल्या या तरुणीच्या दिशेने दोन सेकंदापुरता का होईना कॅमेरामनने कॅमेरा वळवला आणि बघता बघता ती चांगलीच फेमस झाली.

त्यानंतर ही मुलगी नेमकी आहे तरी कोण, हे सर्च करणं सुरु झालं.

या मिस्ट्री गर्लचे नाव दीपिका घोष आहे.

दीपिकाचे इंस्टाग्रामवर 2 लाख 32 हजारपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.

आरसीबीच्या विजयानंतर आतापर्यंत दीपिकाचीच सर्वात जास्त चर्चा आहे.