सचिन तेंडुलकरची 10 नंबरची जर्सी निवृत्त!

बीसीसीआयने अनौपचारिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून 10 नंबरची जर्सी निवृत्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

बोर्डाने याबाबत टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंशी बातचीत केली आणि त्यावर एकमत झालं.

निर्णयानंतर आता संघाच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला 10 नंबरची जर्सी घालता येणार नाही किंवा जर्सी दिली जाणार नाही.

सचिन तेंडुलकरने 10 नंबरची जर्सी ही मार्च 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटची घातली होती.