वर्ल्ड कपमध्ये कोणी रचलंय धावांचं सर्वोच्च शिखर?

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अॅडम गिलख्रिस्टने 1999 ते 2007 या कालावधीत झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये 31 सामन्यांत 1085 धावा केल्या आहेत. 149 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याच्या नावावर 1 शतक व 8 अर्धशतक आहेत.

श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने या क्रमवारीत नवव्या स्थानावर येतो. त्याने 1999 ते 2015 पर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेतील 34 डावांत 1100 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 4 शतकं व 5 अर्धशतकं आहेत.

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू तिलकरत्ने दिलशान हा आठव्या स्थानावर असून त्याने 25 डावांत 1112 धावा केल्या आहेत. 161 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे आणि त्याच्या नावावर 4 शतकं व 4 अर्धशतकं आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज जॅक कॅलिस यानेही 1996 ते 2011 दरम्यान 32 डावांत 1148 धावा चोपल्या आहेत. पण, त्याला केवळ एकच शतकं झळकावता आलं, तर 9 अर्धशतकी खेळी केल्या.

श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने सहाव्या स्थान काबीज केले आहे. त्याने 37 डावांत 1165 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली.

दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स टॉप फाईव्हमध्ये येतो. त्याने 22 डावांत 1207 धावा चोपल्या आहेत आणि 162 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने चार शतकं व 6 अर्धशतकं केली आहेत.

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 33 डावांत 1225 धावा आहेत. त्यात दोन शतकं व 7 अर्धशतकांचा समावेश आहे.

श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा 2003 ते 2015 या कालावधीत चार वर्ल्ड कप स्पर्धा खेळला. त्यात त्याने 35 डावांत 1532 धावा केल्या. त्याच्या नावावर 5 शतकं व 7 अर्धशतकं आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 42 डावांत 1743 धावा केल्या. त्यात 5 शतकं व 6 अर्धशतकं आहेत.

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर या क्रमवारीत टॉपवर आहे. त्याने सहा वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये 44 डावांत 2278 धावा चोपल्या आहेत. त्यात त्याच्या नावावर 6 शतकं व 15 अर्धशतकं आहेत.