रिषभ पंतने धोनीलाही टाकलं मागे, रचला नवीन विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पंतची बॅट चांगलीच तळपली.

पंतच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताला सहाशे धावांचा पल्ला गाठता आला.

या खेळीत पंतचे फटके नजरेचे पारणे फेडणारे होते.

पंतने या सामन्यात शतक झळकावत महेंद्रिसिंग धोनीलाही पिछाडीवर टाकले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या एकाही यष्टीरक्षकाला आतापर्यंत शतक झळकावता आले नव्हते.

धोनीलाही आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावता आले नव्हते.

पंतचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे.

इंग्लंडमध्ये पहिले शतक झळकावत पंतने इतिहास रचला होता.