'द रिची रिच' क्रिकेटपटू

द रिची रिच हे कार्टून तुम्हाला सर्वांना आठवत असेल. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती या कार्टूनमध्ये रेखाटले आहे. असेच जगातील 'द रिची रिच' क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो जगातील पाच श्रीमंत क्रिकेटपटू...

जगातील महान गोलंदाजांपैकी एक असलेला शेन वॉर्न याचे निवृत्तीनंतरचे स्टायलीश राहणीमान नेहमीच चर्चेत राहिले आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार वॉर्नची एकूण उत्पन्न हे जवळपास 50 कोटी अमेरिकन डॉलर ( ₹ 3,59,12,75,000 ) एवढी आहे.

या यादित विराट कोहलीचे नाव नसेल तर आश्चर्य. जगभरात विराट कोहली हे नाव एक ब्रँड झाले आहे. बीसीसीआयकडून त्याला एका दौऱ्यासाठी मिळणारे मानधन पाहून आपण थक्क झालोच आहोत. याच विराटचे एकूण उत्पन्न 60 कोटी अमेरिकन डॉलर ( ₹ 4,30,95,00,000) एवढी आहे.

ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार आणि फलंदाज रिकी पाँटिंग निवृत्तीनंतरही या यादीत कायम आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हील्सच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. त्याचे एकूण उत्पन्न 65 कोटी अमेरिकन डॉलर ( ₹ 4,66,79,75,000) आहे.

रांचीत जन्मलेला आणि आज सर्व क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याचे उप्तन्न 103 कोटी अमेरिकन डॉलर ( ₹ 7,39,69,45,000 ) इतके आहे.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मोहिनी अजूनही कायम आहे. क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक श्रीमंत असण्याचा मान तेंडुलकरने मिळवला आहे. त्याचे उत्पन्न 118 कोटी अमेरिकन डॉलर ( ₹ 8,47,18,10,000 ) इतके आहे.