भारताच्या सर्वोत्तम कर्णधाराची बीसीसीआयने प्रतिष्ठेच्या किताबासाठी केली शिफारस

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीची भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने प्रतिष्ठेच्या पद्मभूषण किताबासाठी शिफारस केली आहे.

भारतीय क्रिकेट आणि कर्णधारपदावरील यशस्वी कारकिर्द याचा विचार करुन त्याचे नाव पद्मभूषण सन्मानासाठी सुचवल्याचे सांगितले.

धोनीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दित भारताने २००७ साली टी २० विश्वचषक आणि २०११ विश्वचषक स्पर्धा जिंकल्या.

३६ वर्षांच्या धोनीने ३०२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९७३७ धावा तर ९० कसोटी सामन्यांमध्ये ४८७६ धावा केल्या आहेत.