मैदानातले ' हे ' वीर यो-यो टेस्टमध्ये ठरताय़त नापास

मोहम्मद शमीने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पण यो-यो टेस्टमध्ये नापास ठरल्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळता आले नाही.

आयपीएलमध्ये सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना धडाकेबाज फलंदाजी केली होती. पण यो-यो टेस्टमध्ये नापास ठरल्यामुळे रैनाला गेल्यावर्षी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते.

एकेकाळी सहा चेंडूंत सहा षटकार लगावणारा युवराज सिंग अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. पण यो-यो टेस्टमध्ये युवराज तंदुरुस्त ठरू शकला नव्हता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आपल्याला सध्या दिसत नाही.