नेयमारची जादूची झप्पी...

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर पुरेशी विश्रांती घेत ब्राझिलचा प्रमुख खेळाडू लीगच्या नव्या मोसमासाठी गुरूवारी चीनमध्ये दाखल झाला. पॅरिस सेंट-जर्मेन क्लबच्या नेयमारला यावेळी आपल्या सहका-यांना भेटण्याचा आनंद लपवता आला नाही. त्याने क्लबच्या मालकांसह सर्व सहका-यांना मिठी मारली..

ब्राझिलच्या नेयमारने पॅरिस सेंट जर्मेनचा कर्णधार थिएगो सिल्वा याला संघ राहत असलेल्या हॉटेलमध्ये मिठी मारली.

अर्जेंटिनाच्या एंजल डी मारिया यालाही 26 वर्षीय नेयमारने मिठी मारून भेट घेतली.

सेंट जर्मेनचे बॉस थॉमस टचेल यांनीही नेयमारचे मिठीनेच स्वागत केले.

मार्को व्हेरॅट्टी याच्याशी नेयमारने ब-याच गप्पा मारल्या.

दिग्गज गोलरक्षक गिगी बफन या नव्या सहका-याची भेट घेण्यास नेयमार विसरला नाही.