आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने विराट कोहलीला आयपीएलसाठी 17 कोटी रूपये दिले आहेत.

विराट कोहलीने रायजिंग पुणे सुपरजायंट्सने 14.5 कोटी देऊन विकत घेतलेल्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सला मागे टाकलं आहे.

बेन स्टोक्सला मागे टाकण्यात विराट कोहलीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्र सिंह धोनी आणि मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माचा सहभाग आहे. धोनी व रोहित शर्माला त्यांच्या टीमने 15 कोटी रूपयात रिटेन केलं आहे.

आता यानंतर २७ आणि २८ जानेवारी रोजी आयपीएलची बोली लागणार आहे. यंदा ४ ते २७ एप्रिलदरम्यान आयपीएल स्पर्धा होणार आहे.