प्रतिस्पर्ध्याला धडकी भरवणारे मॉर्नी मॉर्कल, वेर्नोन फिलँडर, रबाडाही भारताच्या 'रनमशीन'समोर हतबल

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी शानदार 153 धावांची दीड शतकी खेळी केली.

विराटने सेंच्युरियन पार्कच्या मैदानावर करीयरमधील 21 वे कसोटी शतक झळकावले.

विराटचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे हे शतक परदेशातील सर्वोत्तम खेळीपैकी एक असून त्याचे परदेश भूमीवरील हे 11 वे शतक आहे. विराट कोहलीचे नव्या वर्षातील हे पहिलेच शतक आहे.

विराट कोहलीचे दक्षिण आफ्रिकेतील हे दुसरे कसोटी शतक आहे. यापूर्वी 2013 मध्ये आफ्रिका दौ-यावर कोहलीने जोहान्सबर्गमध्ये 119 आणि 96 धावा केल्या होत्या.

कसोटी क्रिकेटमध्ये 150 पेक्षा जास्त धावा करण्याची विराटची ही नववी वेळ आहे.