धोनीची गुगली घेणाऱ्या मयांकचे भारतीय संघात पदार्पण...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारतीय संघात नव्या चेहऱ्याला संधी मिळाली. कोणाचीही अपेक्षा नसताना ट्वेंटी-20 संघांत मयांक मार्कंडेला संघात स्थान देण्यात आले आहे. कुलदीप यादवच्या जागी स्थान पटकावणारा 'Mystery spinner' मयांक मार्कंडे आहे तरी कोण?

21 वर्षीय मयांकने मागील काही महिन्यांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि त्याचे फळ त्याला आज मिळाले. तो भारतीय संघाकडून पदार्पण करण्यासाठी उत्सुक होता.

इंग्लंड लायन्स विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मयांकने भारत A संघाचे प्रतिनिधित्व करताना दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या होत्या.

आयपीएलच्या 2018च्या पर्वात मयांकने 14 सामन्यांत 24.53 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या होत्या.

भटिंडा येथे जन्मलेल्या मयांकने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या महेंद्रसिंग धोनीला पायचीत करून सर्वांना धक्का दिला होता. त्याच्या गुगलीचा अंदाज घेण्यात धोनीही अपयशी ठरला होता. त्यानंतर त्याने अंबाती रायुडू व दीपक चहरलाही बाद केले होते.

आयपीएलच्या 2018च्या पर्वात मयांकने 14 सामन्यांत 24.53 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या होत्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मयांकने 7 सामन्यांत 21.26च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट A क्रिकेटच्या 22 सामन्यांत त्याच्या नावावर 19.97 च्या सरासरीने 45 विकेट्स आहेत.