असा आहे मास्टर ब्लास्टर सचिनचा बंगला, किंमत आहे तब्बल 79 कोटी

2016 साली जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर म्हणूनही त्याची गणना केली गेली. त्याच्या या कारकिर्दीमुळे तो अनेक प्रोडक्टचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडरही आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर मुंबईत वांद्र्‍यातील पेरी क्रॉस रोडवर त्याने स्वत:चं हक्काचं घर घेतलं. ११ जून 2011 साली त्यांनी गृहप्रवेश केला

सचिन तेंडूलकरने 2011 साली बंगल्यात गृहप्रवेश केला असला तरीही तो बंगला खूप जुना आहे. एका पारसी इसमाने तो 1920 साली बांधला होता. 2007 साली सचिन तेंडूलकरने दोराब कुटुंबाकडून 40 कोटींना हा बंगला विकत घेतला. त्यानंतर बंगल्याची नव्याने बांधणी करण्याकरता 39 कोटी रुपये खर्ची घातले. म्हणजे तब्बल 79 कोटीचा हा बंगला आहे.

सचिनचा बंगला मेक्सिकन आर्किटेक्ट जेव्हिअर सेनॉसिअन यांनी बांधला आहे. हा बंगाल बांधून झाल्यावर या आर्किटेक्टचरला अनेक ऑर्डर्स येऊ लागल्या. या संपूर्ण बांधकामावर अंजली तेंडूलकर यांचं बारीक लक्ष होतं.

सचिन तेंडूलकरला त्याच्या कारकिर्दीत अनेक बक्षिसे मिळाली आहेत. त्यामध्ये अनेक गाड्यांचाही समावेश आहे. आता एवढ्या गाड्या ठेवायच्या म्हणजे तेवढी जागा असालयाच हवी. त्यामुळे सचिन तेंडूलकरच्या बंगल्यामध्ये जवळपास 40 ते 50 गाड्या उभ्या राहतील एवढा पार्किंगचा विभाग आहे.

या बंगल्याची खासियत तुम्हाला माहितेय? या बंगल्याची खासियत अशी की, या बंगल्याची संपूर्ण रचना एखाद्या गोगलगाय प्रमाणे केली आहे. म्हणजेच गोगलगायच्या आकाराप्रमाणे हा बंगला बांधण्यात आला आहे.

या बंगल्यासाठी सचिनने 100 कोटींची इन्शुरन्स घेऊन ठेवला आहे. त्यातही फायर इन्शुरन्स पॉलिसीसाठी 75 कोटी तर, इतर अपघातासाठी 25 कोटींचा इन्शुरन्स काढून ठेवण्यात आला आहे.

हा बंगला पाच माळ्यांचा असला तरीही दिसताना तो तीन माळ्यांचा दिसतो. याचं कारण माहितेय? याचं कारण असं की पहिले दोन मजले जमिनी खाली आहेत. म्हणजेच अंडरग्राऊंड फ्लोअर या बंगल्यात बांधण्यात आले आहेत.