महेंद्रसिंह धोनीचा विक्रम!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेआशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत एक वेगळा विक्रम नावावर केला. रविवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना हा धोनीचा एकूण 505 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात खेळून त्याने द्रविडच्या 504 सामन्यांचा विक्रम मोडला.

भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये धोनी दुसऱ्या स्थानी आहे, तर महान फलंदाज सचिन तेंडुलकर 664 सामन्यांसह अव्वल स्थानावर आहे. तेंडुलकरचा सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीला मोडणे शक्य नाही.

धोनीने भारताकडून 90 कसोटी, 325 वन डे आणि 93 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा ट्वेंटी-20 विश्वचषक आणि 2011चा वन डे विश्वचषक जिंकला आहे.

राहुल द्रविडने 504 सामने खेळले आहेत. त्याने एकूण 24064 धावा केल्या आहेत.

या क्रमवारीत मोहम्मद अझरुद्दीन 433 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे. त्याने 15593 धावा केल्या आहेत.

माजी कर्णधार सौरव गांगुलीने या क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे. त्याच्या नावावर 421 सामने आहेत.