IPLमधले 'हॅटट्रिक'वीर तुम्हाला माहीत आहेत का?

बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील 'रॉयल' लढतीवर पावसाने पाणी फिरवलं. प्ले ऑफचे आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना 1-1 गुणावर समाधान मानावे लागले. एकूण 50 चेंडूंच्या या सामन्यात राजस्थानच्या श्रेयस गोपाळने हॅटट्रिक घेत विक्रमाला गवसणी घातली. आयपीएल कारकिर्दीतली त्याची ही पहिलीच हॅटट्रिक ठरली.

लक्ष्मीपती बालाजी ( चेन्नई सुपर किंग्स) वि. किंग्स इलेव्हन पंजाब , 2008

अमित मिश्रा ( दिल्ली डेअरडेव्हिल्स) वि. डेक्कन चार्जर्स, 2008

मखाया एनटीनी ( चेन्नई सुपर किंग्स) वि. कोलकाता नाइट रायडर्स, 2008

युवराज सिंग ( किंग्स इलेव्हन पंजाब) वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 2009

रोहित शर्मा ( डेक्कन चार्जर्स) वि. मुंबई इंडियन्स, 2009

युवराज सिंग ( किंग्स इलेव्हन पंजाब ) वि. डेक्कन चार्जर्स, 2009

प्रविण कुमार ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) वि. राजस्थान रॉयल्स, 2010

अमित मिश्रा ( डेक्कन चार्जर्स ) वि. किंग्स इलेव्हन पंजाब, 2011

अजित चंडिला ( राजस्थान रॉयल्स) वि. पुणे वॉरियर्स इंडिया, 2012

सुनील नरीन ( कोलकाता नाइट रायडर्स) वि. किंग्स इलेव्हन पंजाब, 2013

अमित मिश्रा ( सनरायझर्स हैदराबाद ) वि. पुणे वॉरियर्स इंडिया, 2013

प्रविण तांबे ( राजस्थान रॉयल्स) वि. कोलकाता नाइट रायडर्स, 2014

शेन वॉटसन ( राजस्थान रॉयल्स) वि. सनरायझर्स हैदराबाद, 2014

अक्षर पटेल ( किंग्स इलेव्हन पंजाब) वि. गुजरात लायन्स, 2016

सॅम्युअल बद्री ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) वि. मुंबई इंडियन्स, 2017

अँड्य्रू टाय ( गुजरात लायन्स) वि. रायझिंग पुणे स्टार, 2017

जयदेव उनाडकट ( रायझिंग पुणे स्टार) वि. सनरायझर्स हैदराबाद, 2017

सॅम कुरन ( किंग्स इलेव्हन पंजाब) वि. दिल्ली कॅपिटल्स, 2019

श्रेयस गोपाळ ( राजस्थान रॉयल्स) वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 2019