विराट कोहलीकडून 'या' पाच गोष्टी शिकाच...

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन डे सामन्यात दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्याने 205 डावांत हा टप्पा ओलांडून सर्वात जलद दहा हजार धावांचा विक्रम केला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( 259) याचा विक्रम मोडला. त्याचा इथवरचा प्रवास हा सोपा नक्कीच नव्हता.

विराटने एक यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. फिटनेस असो किंवा खेळात सुधारणा, विराटने प्रत्येक गोष्टीसाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.

विराट शिस्तप्रीय आहे. फिटनेसची तो अधिक काळजी घेतो. त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी जंक फूड खाणे सोडले.

विराट तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळतो. त्यामुळे तो सतत व्यग्र असतो. त्याशिवाय काही व्यवसायिक कमिटमेंटही त्याला पाळाव्या लागतात. व्यग्र वेळापत्रकातही तो व्यायामासाठी वेळ काढतो.

तो प्रत्येक वेळी स्वतःला झोकून देत खेळतो. फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण तो मैदानावर शंभर टक्के योगदान देण्यासाठी तयार असतो.

विराट मैदानावर उतरतो त्यावेळी त्याच्यावर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे असते. याचे दबाव न घेता तो त्या अपेक्षांना प्रेरणा मानून खेळ करतो. त्यामुळेच त्याचा खेळ अधिक उंचावतो.