जाणून घ्या 'द वॉल' द्रविड बद्दल या गोष्टी

गांगुलीप्रमाणेच क्रिकेट खेळण्यापूर्वी राहुल इतर खेळ खेळत होता. द्रविड कर्नाटक ज्यूनियर स्टेट संघाकडून हॉकी खेळला आहे.

11 जानेवारी रोजी जन्मलेल्य राहुलचे टोपणनाव जॅमी असं आहे. त्याच्या या नावामागे एकवेगळीच गोष्ट आहे. राहुलचे वडिल किसान कंपनीमध्ये काम करत होते. त्याठिकाणी जॅम बनवला जात असे, त्यामुळं ते आपल्या मुलाला जॅमी म्हणू लागले

2011 मध्ये इंग्लंडच्या विरोधात 'द वॉल'नं पदार्पण केलं. आणि त्याच सामन्यात त्यानं निवृत्ती स्विकारली. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये द्रिवडचा तो पहिला आणि शेवटचा सामना होता. त्यामुळं पदार्पणातच निवृत्त होण्याचा आगळा वेगळा विक्रम त्याच्या नावावर झाला

कसोटी खेळणाऱ्या प्रत्येक देशाविरोधात शतक झळकावणारा द्रविड जगातील एकमेव क्रिकेटर आहे

द्रविडबद्दल असं बोललं जात की तो फक्त कसोटी खेळणारा क्रिकेटर आहे. पण 1999च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू म्हणून त्याला गौरवण्यात आलं होतं. या विश्वचषकात त्यानं 461 धावांची बरसात केली होती.

राहुल द्रविड असा एकमेव भारतीय आहे जो ऑस्ट्रेलियाच्या संघात खेळण्यास लायक असल्याचे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रॉथंन म्हटलं होतं.

राहुल द्रविड पहिला भारतीय कर्णधार आहे, ज्यानं दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटीमध्ये भारताला पहिला विजय मिळवून दिला होता.

2004-05 मध्ये राहुल द्रविडला सेक्‍सिएस्‍ट स्‍पोर्ट्स पर्सनॅलिटीच्या अवार्डनं गौरवण्यात आलंहोतं. युवराज आणि सानिया मिर्झा यांना नाकारत क्रिडाप्रेमींनी द्रविडला मतं दिली होती.

2004 मध्ये आयसीसीचे बेस्ट प्लेअरचा खिताब मिळाला. आयसीसीनं 2004 पासूनच हा अवार्ड द्यायला सुरुवात केली होती. द्रविडनं ICC Test Player of the year आणि Player of the year हा अवार्ड आपल्या नावे केला होता.