विश्वचषकातील हे विक्रम मोडणं कठीणंच

विश्वचषकातील सर्वाधिक धावांचा विक्रम भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनच्या नावावर विश्वचषकामध्ये 2278 धावा आहेत. आतापर्यंत क्रिकेट जगतातील एकाही फलंदाजाला विश्वचषकात दोन हजार धावाही करता आलेल्या नाहीत.

विश्वचषकातील सर्वाधिक चौकारांचा विक्रमही सचिनच्याच नावावर आहे. सचिननने विश्वचषकात 241 चौकार फटकावले आहेत.

विश्वचषकातील सर्वाधिक विकेट्सचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज ग्लेन मॅग्राच्या नावावर आहे.

एका विश्वचषकातील सर्वाधिक शतकांचा विक्रम श्रीलंकेचा माजी महान फलंदाज कुमार संगकाराच्या नावावर आहे. संगकाराने 2015 साली झालेल्या विश्वचषकात चार शतके झळकावली होती.

विश्वचषकातील बरेच विक्रम सचिनच्याच नावावर आहेत.