मंदिरा ते मयंती... 'या' आहेत आयपीएल गाजवणाऱ्या ग्लॅमरस अँकर

अभिनेत्री आणि प्रसिद्ध सूत्रसंचालिका मंदिरा बेदीनं आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात सूत्रसंचालन केलं होतं. याआधी मंदिरा बेदीनं अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मयंती लँगरनं आयपीएल सामन्यांसह क्रिकेट, फुटबॉलच्या सामन्यांचं सूत्रसंचालन केलं आहे. मयंतीनं विविध वाहिन्यांसाठी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि टीम इंडियाच्या परदेश दौऱ्यांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली आहे.

मॉडेल आणि टीव्ही होस्ट रोशेल रावनंदेखील आयपीएलमध्ये सूत्रसंचालन केलं आहे. याशिवाय तिनं बिग बॉस, झलक दिखला जा अशा विविध रिअॅलिटी शोजमध्ये सूत्रसंचालन केलं आहे.

अर्चना विजयानं आयपीएलच्या सहाव्या मोसमात सूत्रसंचालन केलं होतं. याशिवाय तिनं सीसीएल आणि अन्य स्पर्धांमध्ये सूत्रसंचालन केलं आहे.

आयपीएलमध्ये सूत्रसंचालन करणारी शोनाली नागरानी मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत दुसरी आली होती. तिनं 2006 मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचंही सूत्रसंचालन केलं होतं.

टॅग्स :आयपीएलIPL