IPL 2019 : ख्रिस गेलनं तीनदा मोडला स्वतःचा विक्रम

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) याही मोसमात चौकार - षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार यात शंका नाही. त्यामुळेच येथे झटपट शतकांचा सपाटाच फलंदाजांनी लावला आहे. पण, या चेंडू आणि धावांच्या शर्यतीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आघाडीवर राहिला आहे आणि त्यानं स्वतःच्याच नावावर असलेला विक्रम तीनदा मोडण्याचा पराक्रम केला आहे.

ख्रिस गेलने 2011 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 46 चेंडूंत शतकी खेळी केली होती. त्याच्या या खेळीत 9 षटकार आणि 10 चौकार खेचले.

2015मध्येही गेलने 46 चेंडूंत शतक ठोकले होते, परंतु यावेळी त्याने 12 षटकार व 7 चौकारांची आतषबाजी केली

मुरली विजयने केवळ 46 चेंडूंत पुणे संघांविरुद्ध शतकी खेळी केली. त्यानं 2010च्या हंगामात ही खेळी साकारली होती.

सर्वात जलद शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये सनथ जयसूर्या सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सच्या जयसूर्यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 45 चेंडूंत शतक केले.

डेव्हिड वॉर्नरने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 43 चेंडूंत शतक केले होते.

एबी डिव्हिलियर्सनेही 12 षटकार व 10 चौकारांच्या मदतीनं 43 चेंडूंत शंभर धावा केल्या

2008 मध्ये अॅडम गिलख्रिस्टने 42 चेंडूंत शंभर धावा चोपल्या.

डेव्हिड मिलरने 2013 मध्ये 38 चेंडूंत शंतकी पल्ला पार केला

युसूफ पठाणने 2010 मध्ये 37 चेंडूंत शतक ठोकून सर्वात जलद शतकवीरांमध्ये दुसरे स्थान पटकावले

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकांचा विक्रम गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये अवघ्या 30 चेंडूंत शतक ठोकले होते. पुण्याविरुद्धच्या सामन्यात त्याने 175 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. त्यात 17 षटकार व 13 चौकारांचा समावेश होता.