IPL 2018 : हे आहेत आयपीएलमधील 8 कर्णधार

बंगळुरु संघाची धुरा भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या खांद्यावर आहे.

रोहत शर्माकडे पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघाची धुरा आहे. 2013, 2015 आणि 2017 च्या सत्रामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये मुंबईने चषकावर नाव कोरलं आहे.

भारताचा फिरकी गोलंदाज अश्विन पंजाब संघाचे नेतृत्व करणार आहे.

दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करणारा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज आहे.

डेविड वॉर्नरवर एक वर्षाची बंदी झाल्यामुळं केन विल्यमसनकडे हैदराबाद संघाचे कर्णधारपद आले आहे.

गेल्या सत्रात कोलकाताचे नेतृत्व करणारा गंभीर आता दिल्लीकर झाला आहे. गंभीरच्या अधिपत्याखाली दिल्ली पिहल्यांदाच चषकावर नाव कोरण्याचा प्रयत्न करणार आहे.

इंडियन प्रिमियर लिगच्या 11 व्या सत्रात दिनेश कार्तिक कोलकाता नाइट रायडर्स संघाचं कर्णधारपद सांभाळेल. रॉबिन उथप्पाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दोन वर्षांनी राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. संघाची कमान अजिंक्य रहाणेकडे आहे.