IPL 2018: चीअर लीडर्स किती कमाई करतात, माहितीये का?

दिल्ली डेअरडेविल्स: दिल्लीच्या चिअर लीडर्सना एका सामन्यासाठी 10 हजार रुपये मानधन मिळतं. एका हंगामात एक चिअर लीडर साधारणत: अडीत ते तीन लाखांची कमाई करते.

राजस्थान रॉयल्स: राजस्थानचा संघ एका चीअर लीडरला एका सामन्यासाठी साडे अकरा ते बारा हजार रुपयांचं मानधन देते. या टिमच्या चीअर लीडर एका हंगामात 3 लाख 20 हजार ते 3 लाख 25 हजार रुपयांची कमाई करतात.

चेन्नई सुपर किंग्स: धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईच्या संघानं दोन वर्षांनंतर स्पर्धेत पुनरागमन केलं आहे. या संघाच्या चीअर लीडर्सना एका सामन्याचे 10 हजार रुपये मिळतात.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर: आरसीबीचा संघ प्रत्येक चीअर लीडरला एका सामन्यासाठी 16 ते 18 हजार रुपयांचं मानधन देतो.

सनरायझर्स हैदराबाद: 2016 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावणाऱ्या हैदराबादच्या संघाच्या चीअर लीडर्सला एका सामन्यामागे 10 हजारांचं मानधन मिळतं.

किंग्स इलेव्हन पंजाब: प्रीती झिंटाचा पंजाब संघ एका चीअर लीडरला एका मॅचसाठी 10 हजार रुपये देतो.

मुंबई इंडियन्स: सर्वाधिक चर्चेत असणारा मुंबईचा संघ चीअर लीडर्सना एका सामन्याकाठी 16.4 ते 16.8 हजार रुपये इतकं मानधन देतो.

कोलकाता नाईट रायडर्स: शाहरुख खानचा संघ चीअर लीडर्सना सर्वाधिक मानधन देतो. कोलकात्याच्या संघाला चीअर लीडर्सना एका सामन्यासाठी 19 ते 20 हजार रुपये मिळतात.