IPL 2018 : रोहित शर्मा 'मुंबईकर'च, हे खेळाडू यावर्षी आयपीएल संघानी ठेवले कायम

आयपीएलच्या ११व्या सत्रासाठी लीगमधील सर्व ८ फ्रेंचाईजींनी संघातील काही प्रमुख खेळाडू आपल्याकडे कायम राखले आहेत. मुंबईनं रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवलं आहे.

'सीएसके'ने अपेक्षेप्रमाणे खेळाडू जाहीर करताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना कायम ठेवले.

आरसीबीने ३ खेळाडू कायम ठेवत कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स या प्रमुख खेळाडूंसह युवा सर्फराज खान याची निवड करत सर्वांनाच धक्का दिला.

दिल्लीच्या संघानं रिषभ पंत, क्रिस मॉरिस, श्रेयस अय्यर यांना कायम ठेवलं आहे.

पंजाबनं केवळ एकच खेळाडू कायम ठेवत अनपेक्षितपणे फिरकी अष्टपैलू अक्षर पटेलला पसंती दिली.

हैदराबादनं डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमारने यांना कायम ठेवलं आहे.

कोलकात्तानं गंभीरला डच्चू दिला आणि सुनील नरेन, आंद्रे रसेल यांना कायम ठेवलं आहे.

राजस्थान रॉयल्सनं स्मिथला कायम ठेवलं आहे.