दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाची जंगल सफारी!

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन पराभवानंतर टीम इंडिया तिसरी कसोटी खेळणार आहे. पण सामन्याच्या आधी टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी जंगल सफारीचा आनंद लुटला.

टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री आणि चेतेश्वर पुजाराबरोबरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवरून नेटिझन्सनी दोघांना चांगलंच ट्रोल केलं.

भारताचा सलामीवीर केएल राहुलने चित्त्याबरोबर फोटो काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

शिखर धवननेही त्याच्या पत्नी व मुलांबरोबर जंगल सफारीचा आनंद घेतला.

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिनेही सफारी पार्कमध्ये जनावरांबरोबर खेळण्याची मजा लुटली.

अजिंक्य रहाणेनेही पत्नीबरोबर जंगल सफारीचा आनंद लुटला.

टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीने सिंहाबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.