भारतीय चाहत्यांवरही पाक क्रिकेटपटूंची मोहिनी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध कितीही ताणलेले असले तरी क्रिकेट हा समान धागा उभय देशांतील चाहत्यांना एकत्र आणतो. म्हणून भारतातील चाहतेही पाकिस्तानच्या खेळाडूंचे फॅन आहेत.

पाकिस्तानला 1992चा विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार इम्रान खान यांचा मोठा चाहतावर्ग भारतातही आहे. इम्रान यांच्या गोलंदाजीची शैली भारतातील तरुणानांही वेड लावणारी होती.

पाकिस्तान संघातील चिरतरूण खेळाडू म्हणून ओळखला जाणारा शाहिद अफ्रिदीची स्फोटक फलंदाजी भारतीयांनाही आवडते. भारत-पाक सामन्यात 'बूम-बूम' अफ्रिदीचे फलक घेऊन अनेक भारतीय चाहते दिसले आहेत.

भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर यांच्यातील जुगलबंदीचे आजही उदाहरण दिले जाते. पण, शोएबचे भारतातही अनेक चाहते आहेत.

वसीम अक्रमने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर एक काळ गाजवला. निवृत्तीनंतरही तो समीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. इंडियन प्रीमिअर लीगशीही त्याचे नाते आहे.

टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती होण्यापूर्वीपासून पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याचे भारतात बरेच फॅन्स आहेत.