राहुलपासून धोनीपर्यंत, 'या' दिग्गजांचे शिक्षण माहितीय का?

भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू हे मैदानावर नवनवीन विक्रम रचत असतात. मात्र या स्टार खेळाडूंचं शिक्षण तुम्हाला माहितीय का? शिक्षणापेक्षा आपल्या कर्तृत्वाने क्षेत्र गाजवलेल्या काही प्रसिद्ध खेळाडूंचं शिक्षण जाणून घेऊया.

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या क्रिकेट विश्वात नव्या उंचीवर आहे. मात्र कोहली फक्त 12वी पर्यंत शिकला आहे.

दी वॉल राहुल द्रविडने सेंट जोसेफ कॉलेज ऑफ बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन येथे एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

'सिक्सर किंग' युवराज सिंग फक्त बारावी पास आहे.

माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

धडाकेबाज फलंदाज शिखर धवनने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

डाव्या हाताचा फलंदाज गौतमने गंभीरने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.