श्रीलंकेचा 6 गडी राखत पराभव करत भारतानं 3 - 0 अशी जिंकली एकदिवसीय मालिका

महेंद्र सिंह ढोणीनं 67 धावांची उपयुक्त खेळी करत अजुनही आपण संघासाठी उपयुक्त असल्याचं दाखवून दिलं.

महेंद्र सिंह ढोणी व रोहीत शर्मा यांच्या भागीदारीच्या बळावर भारताने श्रीलंकेला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धूळ चारली.

शतकी खेळी करणाऱ्या रोहीत शर्माचा एक फटका. श्रीलंकेला 218 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने आरामात लक्ष्य पार केलं.

प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत खेळ काही वेळासाठी बंद पाडला. त्यावेळी निवांत बसलेले रोहीत व ढोणी. सामना 35 मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीला धावा करण्यात अपयश आलं. तो 3 धावांवर बाद झाला.