India vs West Indies, Latest News : विंडीजविरुद्ध 'हे' असतील भारताचे अकरा शिलेदार!

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. वेस्ट इंडिज : विजयी मालिका कायम राखण्यासोबतच उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ आज वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ आठवेळा समोरासमोर आले आहेत. त्यात भारतीय संघाने पाच, तर विंडीजने तीन विजय मिळवले आहेत. 1996च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने विंडीजविरुद्धी विजयी परंपरा कायम राखली आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर उभय संघ दुसऱ्यांदा भिडतील.

सलामीला रोहित शर्मा आणि लोकेश राहुल ही जो़डी कायम असणार आहे. रोहितनं आतापर्यंत 4 सामन्यांत 106.66च्या सरासरीनं 320 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकं व एसा अर्धशतकाचा समावेश आहे.

तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहलीच कायम राहिल. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

विजय शंकर हाच चौथ्या क्रमांकासाठी योग्य पर्याय राहणार आहे. याही सामन्यात रिषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता फार कमीच आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्घ 29 धावा केल्या होत्या.

महेंद्रसिंग धोनीवर सध्या टीका होत आहे, परंतु पाचव्या स्थानासाठी त्याच्याइतका सक्षम पर्याय भारताकडे नाही.

सहाव्या क्रमांकावर केदार जाधवचेचा पारडे जड आहे. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी करताना संघासाठी बहुमुल्य योगदान दिले होते.

अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्याचे स्थान पक्के आहे. त्याने गोलंदाजीत योगदान दिले आहे.

युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू संघात कायम राहतील.

मोहम्मद शमी की भुवनेश्वर कुमार याच्यापैकी आज कोणाला संधी मिळेल हा चर्चेचा विषय आहे. पण, शमीलाच अंतिम अकरामध्ये खेळवण्यात येईल. त्याच्या जोडीला जसप्रीत बुमराह आहेच.