India vs New Zealand 1st T20 : हिटमॅन रोहित करणार का कोहलीशी बरोबरी?

न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील विजयानंतर भारतीय संघाने आपला मोर्चा ट्वेंटी-20 मालिकेकडे वळवला आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे आज होणार आहे.

ट्वेंटी-20 क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड सहाव्या स्थानी आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 9 ट्वेंटी-20 सामन्यांत भारताने 2, तर न्यूझीलंडने 6 विजय मिळवले आहेत.

भारताने न्यूझीलंडमध्ये यजमानांविरुद्ध जोन ट्वेंटी-20 सामने खेळले आणि त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. 2009 मध्ये खेळलेल्या या सामन्यातं महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता.

रोहित शर्माला या मालिकेत ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर करण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. रोहितने 90 सामन्यांत 32.89च्या सरासरीने 2237 धावा केल्या आहेत. या विक्रमात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तीट 2272 धावांसह आघाडीवर आहे. पाकिस्तानचा शोएब मलिक 2245 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कर्णधार म्हणून रोहितने 91.66 टक्के सामने जिंकलेले आहेत. त्याने 12 पैकी 11 सामन्यांत विजय मिळवले आहेत आणि या मालिकेतील पहिला सामना जिंकून त्याला विराट कोहलीच्या ( 12 सामने ) विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.

भारताचे फिरकीपटू कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांनी मागील वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे. पण, केदार जाघवने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 9 सामन्यांत 21 विकेट घेतल्या आहेत.

फलंदाजांमध्ये शिखर धवनची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने 18 सामन्यांत 40.52 च्या सरासरीने 689 धावा केल्या आहेत.